माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र 2023 | माझी कन्या भाग्यश्री योजना ऑनलाइन अर्ज | MKBY Application Form | मुलींसाठी सरकारी योजना महाराष्ट्र 2023 | माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र ऑनलाइन अर्ज, फॉर्म PDF, पात्रता, योजनेचे लाभ | शासकीय अनुदान योजना 2023
महाराष्ट्र सरकार राज्याच्या नागरिकांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना आणि सेवा राबवीत असते, याच धोरणाला अनुसरून राज्यातील मुलींसाठी राज्य शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना सुरु केली, या योजनेच्या माध्यामतून महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींचे शक्षण व आरोग्य यांच्या मध्ये सुधारणा करणे मुलींच्या भविष्यासाठी आर्थिक व्यवस्था करणे, याचबरोबर समाजामध्ये मुलींच्या जन्मा विषयीचे नकारत्मक विचारांमध्ये सुधारणा करून मुलींच्या विषयी सकारात्मक विचार निर्माण करणे तसेच बाल विवाह रोखणे आणि मुला इतकाच मुलींचा जन्म दर वाढविणे हा उद्देश समोर ठेऊन महाराष्ट्र शासनाने राज्यात 2014 मध्ये सुकन्या योजना सुरु करण्यात आली आहे, सुकन्या योजनेचा लाभ 1 जानेवारी 2014 पासून जन्मणाऱ्या मुलींना करिता लागू आहेत.
याच प्रमाणे केंद्र सरकारने ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ हि योजना फेब्रुवारी 2014 पासून सुरु केली आहे, ज्या जिल्ह्यांमध्ये मुलींचे प्रमाण कमी आहे अशा जिल्ह्यांमध्ये हि योजना लागू करण्यात आली आहे. सदर योजनेसाठी भारतातील शंभर जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती, यानंतर सुकन्या योजनेचे लाभ कायम ठेऊन माझी कन्या भाग्यश्री योजना सुधारित हि योजना दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून सुरु करण्यात आली. वाचक मित्रहो या लेखामध्ये माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 संबंधित संपूर्ण माहिती देत आहोत, यामध्ये या योजनेचे उद्दिष्ट काय आहे, शासनाचा निर्णय, पात्रता, अर्ज करण्याची पद्धत आणि योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे इत्यादी माहित आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.
महाराष्ट्र सरकारने मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन देण्यासाठी त्याचबरोबर शिक्षणाची खात्री देणे आणि मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे, यासाठी 1 एप्रिल 2016 पासून माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेचा राज्यामध्ये शुभारंभ केला, हि योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व दारिद्य रेषेखाली येणाऱ्या कुटुंबात जन्माला येणाऱ्या दोन मुलींसाठी या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचप्रमाणे दारिद्र्य रेषेवरील (APL) कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलींसाठी सुद्धा या योजनेचा काही प्रमाणात लाभ देण्यात येणार आहे. शासनाच्या वित्त विभागाने सुचविल्याप्रमाणे 1 एप्रिल 2016 लागू करण्यात आलेली माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये अमुलाग्र बदल करून शासन निर्णयानुसार अधिक्रमित करून माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 7.50 लाख रुपये पर्यंत आहे आशा समाजातील सर्व नागरिकांसाठी लागू करण्यात येत आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 महाराष्ट्र उद्दिष्टे (Objectives)
- माझी कन्या भाग्यश्री योजनेचे आणखी काही उद्देश
- लिंग निवडीस प्रतिबंध करणे
- बालिकांचा जन्मदर वाढविणे
- मुलींच्या जीवनमानाबद्दल खात्री देणे
- मुलींचा समान दर्जा आणि शैक्षणिक प्रोत्साहनाकारीता समाजात कायमस्वरूपी सामुदायिक चळवळ निर्माण करणे
- मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे
- सामाजिक महत्वाच्या संस्था म्हणून पंचायती राज संस्था, शहरी स्थानिक समित्या आणि स्थानिक स्तरावरील कर्मचारी यांना या योजनेसाठी प्रशिक्षण देणे या कामामध्ये स्थानिक समुदाय महिला मंडळे, महिला बचत गट व युवक मंडळ यांचा सहभाग वाढविणे.
- जिल्हा, तालुका आणि निम्नस्तरावर विविध संस्था व सेवा देणारे विभाग यांचा समन्वय घडवून आणणे. Maharashtra Majhi Kanya Bhagyashree Yojana (Features): योजनेचे स्वरूप देशातील मुलींचे सबळीकरण करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने सुरवातीला बेटी बचाओ बेटी पाढाओ हि योजना सुरु केली होती, या योजनेसाठी भारतातील शंभर जिल्हांची निवड करण्यात आली होती, यामध्ये महाराष्ट्रातील बीड, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, औरंगाबाद, वाशीम, कोल्हापूर, उस्मानाबाद, सांगली, व जालना या दहा जिल्हांची निवड करण्यात आली होती. या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने सुकन्या योजना राज्यामध्ये लागू केली होती, त्यानंतर या योजनेमध्ये अमुलाग्र बदल करून सुधारित माझी कन्या भाग्यश्री योजना संपूर्ण महाराष्ट्रात सुरु करण्यात आली.
- माझी कन्या भाग्यश्री योजना हि नवीन सुधारित योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबविली जाणार आहे,या
- योजनेच्या अंतर्गत समाजातील सर्व वर्गातील दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे, तसेच शासनच्या नवीन नियमानुसार दारिद्र्य रेषेवरील (APL) पांढरे रेशनकार्ड असणाऱ्या कुटुंबात जन्मणाऱ्या मुलींना सुद्धा या योजनेचा फायदा मिळणार आहे, या योजनांतर्गत सुरवातीला मुलगी सहा वर्षाची असतांना जमा रक्कमेच्या व्याजाची धनराशी मिळेल, या नंतर दुसऱ्या वेळेस मुलगी बारा वर्षाची झाल्यावर व्याजाची रक्कम मिळेल, तसेच मुलगी पूर्ण अठरा वर्षाची झाल्यावर तिला पूर्ण धनराशी मिळेल. योजनेमध्ये मुलगी आणि तिची माता याच्या नावाने बँकेमध्ये संयुक्त सेविंग खाते उघडण्यात येईल ज्यामध्ये सरकार व्दारा वेळोवेळी धनराशी जमा केल्या जाईल. महाराष्ट्र माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 मध्ये मुलीची शैक्षणिक पात्रता कमीतकमी दहावी असणे आवश्यक आहे.
Maharashtra Majhi Kanya Bhagyashree Yojana (Features): योजनेचे स्वरूप
देशातील मुलींचे सबळीकरन करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने सुरवातीला बेटी बचाओ बेटी पाढाओ हि योजना सुरु केली होती, या योजनेसाठी भारतातील शंभर जिल्हांची निवड करण्यात आली होती यामध्ये महाराष्ट्रातील बीड, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, औरंगाबाद, वाशीम, कोल्हापूर, उस्मानाबाद, सांगली, व जालना या दहा जिल्हांची निवड करण्यात आली होती. या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने सुकन्या योजना राज्यामध्ये लागू केली होती, त्यानंतर या योजनेमध्ये अमुलाग्र बदल करून सुधारित माझी कन्या भाग्यश्री हि योजना संपूर्ण महाराष्ट्रात सुरु करण्यात आली,
माझी कन्या भाग्यश्री योजना हि नवीन सुधारित योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबविली जाणार आहे, या योजनेच्या अंतर्गत समाजातील सर्व वर्गातील दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे, तसेच शासनच्या नवीन नियमानुसार दारिद्र्य रेषेवरील (APL) पांढरे रेशनकार्ड असणाऱ्या कुटुंबात जन्मणाऱ्या मुलींना सुद्धा या योजनेचा फायदा मिळणार आहे, या योजनांतर्गत सुरवातीला मुलगी सहा वर्षाची असतांना जमा रक्कमेच्या व्याजाची धनराशी मिळेल, या नंतर दुसऱ्या वेळेस मुलगी बारा वर्षाची झाल्यावर व्याजाची रक्कम मिळेल, तसेच मुलगी पूर्ण अठरा वर्षाची झाल्यावर तिला पूर्ण धनराशी मिळेल. योजनेमध्ये मुलगी आणि तिची माता याच्या नावाने बँकेमध्ये संयुक्त सेविंग खाते उघडण्यात येईल ज्यामध्ये सरकार व्दारा वेळोवेळी धनराशी जमा केल्या जाईल.
महराष्ट्र माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 मध्ये मुलीची शैक्षणिक पात्रता कमीतकमी दहावी असणे आवश्यक आहे, आणि मुलगी अविवाहित असणे आवश्यक आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजना पात्रता व नियम
- सुकन्या योजना माझी कन्या भाग्यश्री योजने मध्ये समाविष्ट करण्यात आल्यामुळे सुकन्या योजनेच्या अटी आणि नियम हे माझी कन्या भाग्यश्री योजनेला लागू राहतील त्याचप्रमाणे सुकन्या योजनेमधील मुलींना माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये सामाविष्ट करण्यात आले आहे.
- या योजनेच्या अंतर्गत योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करतेवेळी मातेने किंवा पित्याने परिवार नियोजनाचा दाखला सादर करणे आवश्यक आहेयोजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी मुलींचे वडील महाराष्ट्राचे कायम निवासी असणे आवश्यक आहे योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्ज करतांना मुलीचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- योजनेमध्ये दुसऱ्या प्रसुतीच्या वेळेस जर जुळ्या मुली झाल्या तर त्या या योजनेस पात्र राहतील.या योजनेच्या अंतर्गत अठरा वर्षांनी मिळणारी डीपॉझीट केलेली मूळ रक्कम आणि त्यावर मिळणारी व्याजाची रक्कम प्राप्त करण्यासाठी मुलीचे वय अठरा वर्षे पूर्ण असले पाहिजे त्याचबरोबर मुलगी कमीतकमी दहावी उतीर्ण असणे आवश्यक आहे आणि मुलगी अविवाहित असणे आवश्यक आहे.
- हि योजना दारिद्र्य रेषेखालील (BPL) तसेच दारिद्र्य रेषेवरील (APL) कुटुंबात जन्मणाऱ्या दोन मुलींना लागू असेल तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सात लाख पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.एखाद्या कुटुंबाने अनाथ मुलीला दत्तक घेतले असेल तर त्या मुलीला त्या कुटुंबाची प्रथम मुलगी मानून या योजनेचा लाभ तिला मिळण्यात येईल, त्याचप्रमाणे बालगृहातील अनाथ मुलींसाठी हि योजना लागू राहील.
- या योजनेमध्ये दोन प्रकारामध्ये योजनेचा लाभ मिळविता येतो एका मुलीच्याजन्मानंतर कुटुंबामध्ये मातेने किंवा पित्याने परिवार नियोजन करणे आणि तसेच दुसऱ्या प्रकारामध्ये दोन अपत्यांच्या जन्मानंतर परिवार नियोजन करणे आवश्यक आहे.
- ज्या लाभार्थींचे खाते जनधन योजनेंतर्गत आहे त्यांना जनधन योजनेंतर्गत असणारे लाभ आपोआप मिळू शकतील, हि योजना आधारसोबत जोडण्यात येईल. योजनेच्या ठराविक मुदतीपूर्वी मुलीचा विवाह झाल्यास किंवा मुलगी दहावी उतीर्ण नसल्यास या योजनेचा लाभ मुलीच्या पालकांना होणार नाही आणि मुलीच्या नवे बँक खात्यामध्ये असणारी रक्कम महाराष्ट्र शासनाच्या नावाने असणाऱ्या खात्यामध्ये जमा होईल.
- माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 सुधारित या योजनेचा लाभ 1 ऑगस्ट 2017 जन्मलेल्या तसेच त्यानंतर जन्मलेल्या मुलींना लागू राहील. परंतु ज्या परिवारामध्ये एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना 1 ऑगस्ट 2017 पासून लागू करण्यात येत आहे. ज्या कुटुंबांना दिनांक 1 ऑगस्ट 2017 पूर्वी एक मुलगी आहे व दिनांक 1 ऑगस्ट 2017 नंतर दुसऱ्या मुलीचा जन्म झाल्यास व माता किंवा पित्याने कुटुंब नियोजनाचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर फक्त दुसऱ्या मुलीला रुपये 25,000/- इतका योजनेचा लाभ देय राहील.ज्या परिवारामध्ये पहिले अपत्य मुलगी आहे व दुसरे अपत्य मुलगी जन्मल्यास तिला हा लाभ देय राहील, परंतु तिसरे अपत्य जन्मल्यास त्यास हा लाभ अनुदेय नसेल. तिसरे अपत्य झाल्यास पहिल्या एक किंवा दोन अपत्यांचे लाभही बंद होतील.
- या योजनेच्या अंतर्गत जर मुलीचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला तर मुलीच्या नावाने गुंतविण्यात आलेली मुदत ठेवीची रक्कम ठराविक मुदत संपल्यानंतर मुलीच्या पालकांना देण्यात येईल.या योजनेमध्ये प्रत्येक मुलीच्या नावाने स्वतंत्र बँक खाते उघडण्यात येईल, तसेच मुलीच्या नवे रक्कम बँकेत जमा केल्यानंतर बँकेकडून देण्यात आलेल्या मूळ गुंतवणूक प्रमाणपत्राची प्रत लाभार्थ्यास देण्यात यावी व त्याची झेरॉक्स शासकीय कार्यालयात जमा करून ठेवण्यात यावी.योजनेच्या अंतर्गत अठरा वर्षांनी मुलीला मिळणारी एक लाख विम्याची रक्कम या धनराशीतून किमान 10,000/- रुपये मुलीच्या कौशल्य विकासावर खर्च करण्यात यावी, जेणेकरून मुलीला कायमस्वरूपी स्वावलंबी होता येईल.
- ज्या कुटुंबाला एका मुलीच्या जन्मानंतर माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ मिळवायचा आहे त्यांनी एका वर्षाच्या आत कुटुंब नियोजन करून त्याचा प्रमाणपत्र संबंधित शासनच्या अधिकाऱ्या कडे अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी दोन मुलींनंतर सहा महिन्याच्या आत परिवार नियोजन शस्त्रक्रिया केली आहे, ते या योजनेचा लाभ मिळविण्यास पात्र राहतील.
महाराष्ट्र माझी कन्या भाग्यश्री योजना लाभ (Benefits)
महाराष्ट्र राज्यात सुरुवातीला असलेल्या सुकन्या योजनेचे लाभ कायम ठेऊन नवीन सुधारित माझी कन्या भाग्यश्री हि योजना राज्यात सुरु करण्यात आली आहे, या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना अधिक लाभ देण्यात येणार आहेत, हि योजना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबविली जाणार आहे. माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत दोन प्रकारच्या लाभार्थ्यांना लाभ मिळविता येतो.
- लाभार्थी एक प्रकारामध्ये कुटुंबामध्ये एक मुलगी आहे व मातेने कुटुंब नियोजन केले आहे
- लाभार्थी प्रकार दोनमध्ये कुटुंबामध्ये एक मुलगी आहे आणि मातेने दुसऱ्या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे. अशा परिस्थितीत दोन्ही मुलींना योजनेचा लाभ देय राहील, परंतु ज्या कुटुंबामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी अशी अपत्ये आहेत त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- माझी कन्या भाग्यश्री योजना सुधारित दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून नवीन निर्णयाप्रमाणे ज्या परिवारचे वार्षिक उत्पन्न 7.5 लाख रुपये पर्यंत आहे अशा समाजातील सर्व नागरीकांसाठी लागू करण्यात येत आहे. या योजनेचा लाभ खालीलप्रमाणे राहील.
- पहिल्या प्रकारामध्ये कुटुंबामध्ये एका मुलीनंतर, मातेने किंवा पित्याने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर शासनाकडून मिळणारी अनुदानाची रक्कम रुपये 50,000/- राष्ट्रीयकृत बँकमध्ये मुदत ठेव योजनेत गुंविण्यात येईल.
- यानंतर बँकेमध्ये मुलीच्या नावे मुदत ठेवीत गुंतविलेले 50,000 रुपये रकमेवर सहा वर्षात देय असलेले फक्त व्याज मुलीला वयाच्या सहाव्या वर्षी काढता येईल.
- पुढे पुन्हा मुद्दल 50,000/- रुपये मुदत ठेवीत गुंतवणूक करून सहा वर्षासाठी देय असलेले फक्त व्याज वयाच्या बाराव्या वर्षी मुलीला काढता येईल
- त्यांनंतर पुढे पुन्हा 50,000/- रुपये मुदत ठेवीत गुंतवणूक करून सहा वर्षासाठी देय असलेले व्याज प्लस मुद्दल दोन्ही रक्कम वयाच्या अठराव्या वर्षी मुलीला काढता येईल.
- कुटुंबामध्ये मुलीचा जन्म झाल्यांनंतर माता किंवा पित्याने परिवार नियोजन शस्त्रक्रिया केली असेल आणि तसे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच 50,000/- रुपये एवढी रक्कम मुलीच्या नावाने जमा केल्या जाईल आणि अशा प्रकारे बँकमध्ये मुदत ठेवीमध्ये जमा केलेल्या रकमेवर त्यावेळी मुलीच्या वयानुसार देय असलेली व्याजाची रक्कम मुलीला मिळण्यात येईल.
- दुसऱ्या प्रकारामध्ये कुटुंबामध्ये दोन मुलीनंतर मातेने किंवा पित्याने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर शासनाकडून देय असलेली अनुदानाची रक्कम पहिल्या आणि दुसऱ्या मुलीच्या नावाने प्रत्येकी रुपये 25,000/- याप्रमाणे 50,000/- रुपये एवढी रक्कम दोन्ही मुलींच्या नावाने बँकेमध्ये मुदत ठेव योजनेमध्ये गुंतविण्यात येईल.
- त्यानंतर बँकेमध्ये मुलीच्या नावे मुदत ठेवीत गुंतविलेले 25,000 रुपये रकमेवर सहा वर्षात देय असलेले फक्त व्याज मुलीला वयाच्या साहव्या वर्षी काढता येईल.
- पुढे पुन्हा मुद्दल 25,000/- रुपये मुदत ठेवीत गुंतवणूक करून सहा वर्षासाठी देय असलेले फक्त व्याज वयाच्या बाराव्या वर्षी मुलीला काढता येईल
- त्यांनंतर पुढे पुन्हा 25,000/- रुपये मुदत ठेवीत गुंतवणूक करून सहा वर्षासाठी देय असलेले व्याज प्लस मुद्दल दोन्ही रक्कम वयाच्या अठराव्या वर्षी मुलीला काढता येईल.
- कुटुंबामध्ये मुलीचा जन्म झाल्यांनंतर माता किंवा पित्याने परिवार नियोजन शस्त्रक्रिया केली असेल आणि तसे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच 25,000/- रुपये एवढी रक्कम मुलीच्या नावाने जमा केल्या जाईल आणि अशा प्रकारे बँकमध्ये मुदत ठेवीमध्ये जमा केलेल्या रकमेवर त्यावेळी मुलीच्या वयानुसार देय असलेली व्याजाची रक्कम मुलीला मिळण्यात येईल.
माझी कन्या भाग्यश्री योजना आवश्यक कागदपत्र
- लाभार्थी मुलीचे पालक महाराष्ट्राचे कायमचे रहिवासी असणे आवश्यक आहे, पालकाचे अधिकृत राहिवासी प्रमाणपत्र
- मुलींचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र
- लाभार्थी कुटुंबाने योजनेसाठी अर्ज करतेवेळी एका मुलीनंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र
- योजनेसाठी अर्ज कारणाना लाभार्थी कुटुंबाने दोन मुलींच्या नंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
- अर्जदाराचे आधार कार्ड
- BPL श्रेणी रेशनकार्ड
- मिळकत प्रमाणपत्र
- अर्जदाराचे मोबाइल नंबर
- मुलीचे व मातेचे बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो

No comments:
Post a Comment