Wednesday, January 11, 2023

इलेक्ट्रिक बिल मोबाईल वर कसे बघायचे.

 

नमस्कार मित्रांनो आज मी आपल्याला सांगणार आहे कि आपले इलेक्ट्रिक चे बिल मोबाइल वर कसे बघायचे. 

खुप वेळा आपल्या घरी बिल पोहचू शकत नाही .त्यामुळे आपलं बिल हे थकीत राहते .आपल्याला ऑफिस मध्ये जाऊन वीज बिल आणावे लागते . जर आपण त्या महिन्यात वीज बिल भरले नाही तर आपल्याला अतिरिक्त दंड भरावा लागतो . पण आपण आता आपल्या मोबाइल वर बिल चेक करून बिल भरणा करू शकतो.


त्यासाठी आपल्याला गूगल वर जाऊन  view and pay bill  हे लिहायचं  आहे  नंतर तुम्हाला  www.mahadiscom.in हे तुम्हाला हे दिसेल याच्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे .





mahadiscom वर क्लिक केल्यांनतर आपल्यासमोर एक नवीन PAGE  ओपन होईल .
सगळ्यात वर यामध्ये consumer  type चा ऑपशन दिसेल. 
आपल्याला घरचे बिल चेक करायचे असेल तर  L.T . CONSUMER  हे  निवडावे लागेल. 


खाली आपल्याला आपलं CONSUMER  NO.  टाकावा लागेल . जुन्या बिल वरून पाहून टाकू शकता  व बिलिंग युनिट पण टाकावे लागेल. नंतर आपल्याला खालील बॉक्स मधील कोड जशाच्या तसा टाकायचा आहे  



नंतर आपल्यासमोर VIEW BILL  असा येईल त्यावर क्लिक करून आपल्यासमोर बिल ओपन होईल.



 

नंतर आपण त्या बिलाची प्रिंट काढून ते बिल भरू शकतो . 


याप्रकारे आपण आपले बिल मोबाईल वर चेक करू शकतो आणि वीज बिल भरणा करू शकतो .

No comments:

Post a Comment